Wednesday, September 17, 2025

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद

मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. दरम्यान, आज अंबाबाईचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. यामुळे दिवसभर गाभाऱ्याचा दरवाजा बंद राहील. यामुळे भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.

सकाळी साडे आठ वाजल्यापासून आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीकडून गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. वॉटर जेट मशिनच्या मदतीने ही स्वच्छता केली जाईल. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही स्वच्छता पूर्ण होईल. ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आधीसारखे सुरू होईल अशी माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, महासरस्वती मंदिरात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा