Wednesday, September 17, 2025

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद मंडळासमोरील रस्त्यावर हे झाड कोसळले.

दरम्यान, या दुर्घटनेत एक चारचाकी थोडक्यात अपघात होताना बचावली.

झाडं कोसळल्यामुळे पोर्तुगीज चर्च ते शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च येथे जाणारी दुहेरी वाहतूक बंद झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनाकडून झाड तातडीने रस्त्यावरून हटवण्यात काम सुरु आहे.

 
Comments
Add Comment