Monday, September 15, 2025

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली. केवळ मुंबईतच नव्हे तर नवी मुंबई आणि ठाण्यातही रात्रभर पाऊस कोसळत होता. नवी मुंबईत सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली असून ठाण्यातही तासाभरापासून पाऊस थोडा ओसरला आहे. मात्र असे असले तरी काळ्या ढगांनी केलेली गर्दी कायम आहे.

मुंबईत गेल्या नऊ तासांमध्ये झालेला मुसळधार पाऊस

कुलाबा 88.2 वांद्रे 82.0 भायखळा 73.0 टाटा पॉवर 70.5 जुहू 45.0 सांताक्रुझ 36.6 महालक्ष्मी 36.5

रेल्वे वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ५- १० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे मध्य रेल्वेच्या गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने सुरू आहेत.
Comments
Add Comment