Friday, September 12, 2025

प्रभाकर मोरे म्हणतायत... ‘शालू झोका दे गो मैना’

प्रभाकर मोरे म्हणतायत... ‘शालू झोका दे गो मैना’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेते प्रभाकर मोरे यांचे ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. आता हे गाणे ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे. अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले असून ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा संगीतमय चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी ‘लास्ट स्टॉप खांदा... ’ प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment