
मोहित सोमण: सोन्याने आणखी एक उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवरील भूराजकीय स्थितीचा फटका जागतिक सोन्याच्या बाजारपेठेत बसला असताना आता भारतीय सराफा बाजारा तही गेल्या २ आठवड्यात सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. काल सोने नव्या उच्चांकावर गेले असताना त्यात आणखी एक भर पडली आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २१.९० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रूपयांनी वाढ झाली आहे. परिणामी सोन्याचा प्रति ग्रॅ म दर २४ कॅरेटसाठी ११०५१ रूपये, २२ कॅरेटसाठी १०१३० रूपये, १८ कॅरेटसाठी ८२८८ रूपयांवर पोहोचला आहे.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २१९ रूपयांनी वाढ झाली असून २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६० रूपयांनी वाढ झाली. परिणामी २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ११०५०९ रूपये, २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १०१३०० रूपये, १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ८२८८० रूपयांवर पोहोचली आहे. आज जागतिक सोन्याच्या गोल्ड निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.११% वाढ झाली आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याचा प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११०७३ रूपये, २२ कॅरेटसा ठी १०१५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४०५ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समधील (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याका ळपर्यंत ०.०६% वाढ झाल्याने दरपातळी १०९०९६ रूपयांवर गेली. जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.५२% वाढ झाली आहे.
आजची जागतिक परिस्थिती पाहता आणखी सोन्याच्या वाढीची अपेक्षित होती. मात्र दुपारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयात किरकोळ वाढ झाल्याने सोने दरपातळी मर्यादेत वाढली. जागतिक पातळीवरील युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता, युएसकडून टॅरिफवाढ, तसेच आगामी युएस महागाई आकडेवारीवरील अनिश्चितता यामुळे सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती आजही गगनाला भिडल्या आहेत.