
मोहित सोमण: प्रसिद्ध कंपन्या अर्बन कंपनी (Urban Company), बोट (Boat) यांच्या आयपीओला बाजार नियामक सेबीने अखेरीस मान्यता दिली आहे. सेबीने दोन्ही कंपन्याना आयपीओसाठी परवानगी दिल्याने दोन्ही कंपन्यांचा शेअर बाजारातील मार्ग खुला झाला आहे. अर्बन कंपनीने आयपीओसाठी एप्रिल महिन्यात डीएचआरपी अर्ज (Draft Red Herring Prospectus DHRP) केला होता. अर्बन कंपनीचा ४२९ कोटीचा हा आयपीओ असणार असून ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १४७१ कोटी मूल्याचे आयपी ओसाठी बाजारात उपलब्ध असतील. दुसरीकडे प्रसिद्ध बोट ब्रँड असलेली इम्याजिन मार्केटिंग (Imagine Marketing Limited) कंपनीने गोपनीय पद्धतीने डीएआरपी भरला असल्याची माहिती पुढे आली आहे. काही अहवालातील माहितीनुसार, बोट कंपनी चा आयपीओ १३००० कोटींचा असू शकतो.
अर्बन कंपनीने आतापर्यंत ४५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक जागतिक पटलावरून मिळवली आहे. अर्बन कंपनीने भारतातील प्रमुख शहरात आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमधील दिलेल्या माहितीनुसार, अर्बन कंपनीने आर्थिक वर्ष २५ मध्ये वार्षिक तुलनेत ३८% वाढ नोंदवली आहे आणि नफा मिळवत ११४४ कोटींवर पोहोचली आहे, तर निव्वळ उत्पन्नात २८.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आयपीओमधून मिळणारे उत्पन्न सेवा गुणवत्ता वाढविण्यासाठी, विद्यमान क्षेत्रांमध्ये पुर वठा वाढवण्यासाठी आणि नवीन श्रेणींमध्ये विस्तार करण्यासाठी वापरण्याची अपेक्षा आहे.' असे म्हटले आहे.
बोट कंपनी ही ऑडिओ वेअरेबल्स, स्मार्टवॉच आणि वैयक्तिक अक्सेसरीज इत्यादी उत्पादन पोर्टफोलिओ असलेली कंपनी आहे. बोट (boAt) भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडपैकी एक म्हणून सध्या उदयास आली आहे प्रसारमाध्यमांनी दिले ल्या माहितीनुसार, बोटने आतापर्यंत १७० दशलक्ष डॉलर्स उभारले आहे. २०१६ साली या कंपनीची स्थापना झाली होती. बोट व अर्बन कंपनीसह WeWork India, PhysicWallah, Groww कंपन्यांनीही सेबीकडे डीएचआरएपी भरून आयपीओसाठी अर्ज केले आ हेत.