Thursday, September 18, 2025

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

मुंबई : म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सिडकोकडून घरे उपलब्ध करून दिली जातात. म्हाडा पाठोपाठ आता सिडकोने घरांची सिडकोनं नवी मुंबईतील तब्बल २२ हजार घरांची लॉटरी काढली आहे.

म्हाडा किंवा सिडकोच्यावतीने दरवर्षी घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाते. सणासुदीच्या मुहूर्तावर लॉटरी जाहीर केली जात असते. म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने घरांची लॉटरी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानंतर आता नवी मुंबईतील घरांसाठी सिडकोच्यावतीने लॉटरी काढण्यात येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर होणार असून या लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा लवकर केली जाणार आहे.

दरम्यान सिडकोच्या घराचे किंमती कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या तुलनेत सिडकोच्या किमती काहीशा जास्त असल्याने नागरिक या लॉटरीकडे पाठ फिरवत असतात. घरांच्या किमती कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळेच आता घरांच्या किमतींसंदर्भात निर्णयासाठी नगरविकास विभागाने एक विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत घरांच्या किमीत कमी करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.

सिडकोच्या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, खारघर तर पनवेलमधील तळोजा, द्रोणागिरी या ठिकाणी आहेत. लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या जाहिरातीत घरं नेमकी कुठं आणि त्यांची किंमत किती याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने घरांच्या किमती कमी केल्यास लॉटरी काढण्यास सिडको पूर्णपणे तयार आहे. सिडकोची घरे बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीची आहेत. खासगी बिल्डर्सच्या इमारतींपेक्षा दर्जेदार आहेत. यामध्ये २५ लाखांपर्यंतची घरे उपलब्ध असून घराची किंमत त्याच्या स्थानानुसार ठरवली जात असते.

Comments
Add Comment