
प्रतिनिधी:दररोजच्या जीवनात आवश्यक असलेल्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत व्यवसायिकांना मोठा दिला मिळाला आहे. केंद्र सरकारने व्यवसायिक गॅसवर (Commercial Gas) प्रति गॅस युनिटमागे ५१.५० रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे गॅस आता मुंबईत १५३१.५० रूपयांना मिळू शकेल. नवी दिल्लीत यांची किंमत १५८०, कलकत्ता व चेन्नईला अनुक्रमे १६८४, १७३८ रूपये प्रति युनिट झाली आहे. आजपासून गॅस दर कपात लागू झाली असून सलग पाचव्यांदा व्यवसायिक गॅसच्या किंमतीत घसरण झा ली आहे.घरगुती सिलेंडर किंमती मुंबईसाठी ८५२.५०, दिल्लीसाठी ८५३, कलकत्तासाठी ८७९, चेन्नईसाठी ६६८.५० रूपयांवर कायम आहेत.
हे दर का कमी झाले ?
भारताच्या कच्च्या तेलाच्या किंमतीसह गॅसच्या किंमतीही आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारावर अवलंबून असतात. याशिवाय सरकार गॅसवर अतिरिक्त सब्सिडी वेळोवेळी देते. विशेषतः इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या मुख्य प्रवाहाती ल कंपन्यांनी आपल्या गॅस उत्पादनातील किंमतीत कपात झाल्याने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय तेलासह गॅसचा पुरवठा जागतिक परदेशी चलनावरही आधारित असतात. त्यामुळे उपलब्ध आर्थिक परिस्थितीतील अनुकुलता पाहता कंपन्यांनी व्यवसायिक गॅस च्या युनिट्समधील किंमतीत घसरण केली आहे. ज्यामुळे उद्योगधंद्यांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.