
युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव
मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपने आपले वर्चस्व राखत उबाठाला धोबीपछाड केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी २१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रस्थापित पॅनेलचा मोठा धुव्वा उडाला.
बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व असलेल्या जय सहकार पॅनेलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले आले असून प्रथमच विष्णू भोईर आणि किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली आहे. जय सहकार पॅनेल हे उबाठा शिवसेना आणि भाजपच्या प्रविण दरेकर यांच्याशी संलग्न होते.
भाजपशी संलग्न असलेले विष्णू घुमरे यांच्यासह काही जणांचा विजय झाला असला तरी उबाठाचे सिनेट आणि युवासेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांचा काठावर पराभव झाला.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल तब्बल ६० हजारांहून अधिक सभासद असून, त्यापैकी संध्याकाळपर्यंत ४५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या रिंगणात वकील गुणवंत सदावर्ते यांनी शेवटच्या क्षणाला माघार घेतल्याने प्रस्थापित उबाठा शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह भाजपचे प्रविण दरेकर यांच्याशी संलग्न पॅनेलमध्ये खरी लढत होती.
शुक्रवारी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. या मतमोजणीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने एका व्यक्ती विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मात्र, निवडणुकीमध्ये प्रस्थापित दरेकर आणि उबाठा शिवसेनेशी संलग्न असलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला.
या निवडणुकीत जय सहकार पॅनेलचे केवळ पाच उमेदवार निवडून आले आहेत. तर उर्वरीत सर्व उमेदवार सहकार पॅनेलचे निवडून आले आहेत.
निवडून आलेले संचालक मंडळ
- किरण खंडेराव आव्हाड (मतदान : ९७१५ )
- विष्णू गजाभाऊ घुमरे (मतदान : ८९१२ )
- विवेक विजय आठवले (मतदान :८२५४ )
- मुकेश वसंत घुमरे (मतदान : ८११२ )
- अभिजित नारायण बागुल (मतदान : ८१०७ )
- सुरेश तुकाराम घारे (मतदान : ७९९१ )
- महेश ठाकरे (मतदान :७३४५ )
- बिपिन अरविंद बोरीचा (मतदान : ७१६३ )
- संतोष रामचंद्र दरेकर (मतदान : ७१००)
- रविंद्र दामोदरे (मतदान : ६७५८ )
- विजय नाना जाधव (मतदान : ६७५६ )
- कुणाल रमेश कसबे (मतदान : ६५१३ )
- इंदल ताराचंद राठोड (मतदान : ६४८४ )
- नितीन बनसोडे (मतदान : ६२५६ )
- कविता विशे (मतदान :८७८१ )
- लीना इंगळे(मतदान :८५८१ )
- गिरीश जाधव (मतदान : ७०६६ )
- भानुदास भोईर (मतदान : १३,७७६ )
- राजेंद्र कराडे (मतदान : ८७७३ )