Thursday, September 18, 2025

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या कार्यकारी आदेशावर सही केली असून त्यामुळे अमेरिका भारताकडून होणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर आता एकूण ५० टक्के शुल्क आकारणार आहे. व्हाइट हाऊसने याची अधिकृत घोषणा केली आहे.

या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे भारताकडून रशियन तेलाची खरेदी. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “भारत आमच्यासोबत भरपूर व्यापार करतो, पण आम्हाला त्यांच्याशी व्यापार करता येत नाही. त्यामुळे आम्ही २५ टक्के शुल्क ठरवलं होतं, पण आता ते आणखी मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत. पुढच्या २४ तासांत हे शुल्क लक्षणीय वाढवले जाईल.”

अशा प्रकारे, ट्रम्प यांनी भारताकडून होणाऱ्या आयातीवर आधीच लागू असलेल्या २५% शुल्कात आणखी २५% वाढ केल्याने एकूण आयात शुल्क ५०% पर्यंत पोहोचले आहे.

व्हाइट हाऊसचा आदेश काय म्हणतो?

या कार्यकारी आदेशात, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून रशियन तेलाच्या खरेदीला उत्तर देण्यासाठी भारतावर हे अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार:

  • भारताकडून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २५% अतिरिक्त शुल्क लागू करण्यात येईल.

  • हे शुल्क २१ दिवसांनंतर लागू होईल, म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी पोहोचलेल्या व प्रवासात असलेल्या मालावर ते लागू होणार नाही.

भारताची तीव्र प्रतिक्रिया

भारत सरकारने यावर कडक प्रतिक्रिया दिली असून परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाला “अन्यायकारक आणि अवाजवी” ठरवले आहे. भारताने असे आरोप केले की, अमेरिका आणि युरोपियन युनियन व्यापाराच्या नावाखाली भारताला लक्ष्य करत आहेत.

MEA च्या निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिका आणि युरोपियन देश स्वतः रशियन उर्जेशी व्यवहार करत असूनही भारतावर दबाव आणत आहेत, हे दुहेरी धोरण आहे. भारत या बाबतीत कोणताही अन्याय सहन करणार नाही.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment