Saturday, October 4, 2025

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग

लोकसभा अध्यक्षांना, राज्यसभा सभापतींना निवेदन सादर

नवी दिल्ली : घरात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी चर्चेत आलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सोमवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, लोकसभेच्या १४५ खासदारांनी वर्मा यांच्याविरुद्ध आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली. राज्यसभेतील ५४ खासदारांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दिला. खासदारांनी स्वाक्षरी केलेले निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना सादर केल्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

या महाभियोग प्रस्तावाला भाजप, काँग्रेस, टीडीपी, जेडीयू, सीपीएम यांसह विविध पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

Comments
Add Comment