Sunday, September 14, 2025

सरीवर सरी आल्या गं

सरीवर सरी आल्या गं
सरीवर सरी आल्या गं सचैल गोपी न्हाल्या गं गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कांपति निंब-कदंब घनांमनांतून टाळ-मृदंग तनूंत वाजवी चाळ अनंग पाने पिटती टाळ्या गं सरीवर सरी आल्या गं मल्हाराची जळांत धून वीज नाचते अधुनमधून वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून घुमतो पांवा सांग कुठून? कृष्ण कसा उमटे न अजून? वेली ऋतुमती झाल्या गं सरीवर सरी आल्या गं हंबर अंबर वारा गं गोपी दुधाच्या धारा गं दुधांत गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून मी-तू-पण सारे विसरून आपणही जाऊ मिसळून सरीवर सरी आल्या गं दुधांत न्हाऊनी धाल्या गं सरीवर सरी : सरिवर सरी - बा. भ. बोरकर
Comments
Add Comment