Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

मुंबईत नारळाचे दर कडाडले

मुंबईत नारळाचे दर कडाडले

मुंबई : कोरोनानंतर शहाळ्यांचा खप ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला, दुसरीकडे नारळाची निर्यातदेखील वाढल्याने आवक घटली. परिणामी, मुंबईत चातुर्मासाआधीच एका नारळाची किंमत ३५ ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चातुर्मासात हे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ ६५ ते ७२ रुपयांपर्यंत विक्री होईल, अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूत घाऊक व्यापाऱ्यांना नारळ किलोवर खरेदी करावा लागतो. तर एपीएमसीत नगावर विक्री करतात. सध्या तामिळनाडूत ६८ ते ७० रुपये किलो दराने नारळाची विक्री होते. तेच नारळ आषाढीपर्यंत ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत विक्री होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

नारळ उत्पादनात ३५ ते ३० टक्के नारळ शहाळ्यांसाठी वापरले जात असून, २० ते २५ टक्के नारळाची परदेशात निर्यात होते. उर्वरित ४० टक्के नारळ महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. घाऊक व्यापाऱ्यांकडून नारळाची मागणी वाढली तरी आवक घटल्याने दरवाढ सुरू झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >