Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरव

अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरव

मुंबई : मराठीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळख प्राप्त करणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांना अमेरिकेतील मराठी बांधवांच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.याबद्दल स्वत: अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, अजून एक आनंदाचा क्षण… "हे विश्वची माझे घर …" नाटकानी मला काय दिलं? असं विचारलं तर, जगभरांत माझ्यावर प्रेम करणारी मराठी माणसं दिली … काल अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमांत मला "हृदय सम्राट…" हा किताब देउन अनेक वर्षं अमेरिकेत राहूनही आपलं मराठीपण जपलेल्या प्रेक्षकांनी मला गौरवित केलं… हे सगळं केवळ आणि केवळ "नाटकामुळेच…" आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे … कायम ऋणी राहीन !!! असं म्हणत दामले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रशांत दामले यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी मुंबई शहरात झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम दामले आहे. त्यांचे लग्न गौरी दामले यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुली आहेत. मुंबईत लहानाचे मोठे झाले असलेले प्रशांत दामले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांना लोकांना सतत हसवायला खूप आवडते आणि ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून हे काम उत्तमपणे पार पाडत आहेत. प्रशांत दामले यांना 'टूर टूर' या सुप्रसिद्ध मराठी नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. हे त्यांच्यासाठी एक मोठे यश ठरले आणि अशा प्रकारे त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर प्रवेश केला होता.

Comments
Add Comment