Friday, January 16, 2026

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला तब्बल १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे शिक्षक प्रोफेसर एम एम शर्मा यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला ते उपस्थित होते. यावेळी त्यांना आपले शिक्षक एम एम शर्मा व जे बी जोशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

आपल्या भाषणात मुकेश अंबानी यांनी प्रोफेसर शर्मा यांच्या भारतीय केमिकल उद्योगक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांना ' राष्ट्रगुरू - भारताचा गुरू ' असे म्हटले आहे. ' ते जेव्हा आम्हाला सांगत तेव्हा फक्त आम्ही ऐकत होतो. तेव्हा आम्ही फार विचार करत नव्हतो. यावेळी त्यांनी एका जुन्या प्रसंगाची आठवण करुन देत सांगितले की प्रोफेसर शर्मा म्हणाले होते ' मुकेश तुला आयसीटी संस्थेसाठी काहीतरी मोठे करायचे आहे'. याचवेळी अंबानी यांनी ' गुरूदक्षिणा ' म्हणून विनाअट १५१ कोटींची देणगी संस्थेला जाहीर केली आहे.

मुकेश अंबानी यांनी आयसीटीला तीन तासांचा वेळ दिला होता. यावेळी प्रोफेसर शर्मा यांचे आत्मचरित्र ' डिवाईन सायंटिस्ट ' यांचे प्रकाशन करण्यात आले आहे. अंबानी यांनी यूडीसीटीमध्ये प्राध्यापक शर्मा यांच्या पहिल्या व्याख्यानाने त्यांना कसे प्रेरित केले आणि नंतर प्राध्यापक शर्मा यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांच्या शिल्पकाराची भूमिका कशी बजावली याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >