Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

English Language : इंग्रजी आता अमेरिकेची अधिकृत भाषा

English Language : इंग्रजी आता अमेरिकेची अधिकृत भाषा

वॉशिंग्टन : इंग्रजी ही अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातल्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. सरकारी निधी मिळणाऱ्या सरकारी एजन्सी आणि संघटनांना आता पूर्वीप्रमाणे इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेतून कागदपत्रे मिळावीत का, याचा निर्णय या संस्था आणि संघटनांना घ्यायचा आहे. हा निर्णय घेण्याची अनुमती सर्व संबंधित संस्ता आणि संघटनांना आहे.

इंग्रजीशिवाय अन्य भाषा बोलणाऱ्यांसाठी भाषा सहायक उपलब्ध करून देणे आवश्यक असलेला आदेश माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी लागू केला होता. मात्र ट्रम्प यांच्या आदेशांमुळे क्लिंटन यांचा आदेश रद्दबातल करण्यात आला आहे. भाषा सुविधेसाठी आता राष्ट्रीय सरकारकडून निधी उपलब्ध होणार नाही. इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित केल्यामुळे संवादात सुसूत्रता आणली जाईल. तसेच राष्ट्रीय मूल्यांची जोपासना केली जाईल आणि अधिक एकसंघ, प्रभावी समाज निर्मिती केली जाईल, असे ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशात म्हटले आहे.

अमेरिकेतील ३० हून अधिक राज्यांनी इंग्रजीला त्यांची अधिकृत भाषा म्हणून घोषित करणारे कायदे आधीच मंजूर केले आहेत, अमेरिकेत इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करावे, अशी मागणी संसदेतल्या अनेक सदस्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.

Comments
Add Comment