Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Viral Video : मुलाने कुत्र्याला लिफ्टमध्ये आणण्यास दिला नकार; चिडलेल्या महिलेने काय केले पहाच...

Viral Video : मुलाने कुत्र्याला लिफ्टमध्ये आणण्यास दिला नकार; चिडलेल्या महिलेने काय केले पहाच...

नोएडा : ग्रेटर नोएडामध्ये पाळीव श्वानावरुन एका महिलेने लहान मुलाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 'तुमच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका' असं सांगणाऱ्या लहान मुलाला महिलेने संतापून मुलाला लिफ्टमधून खेचत बाहेर काढून त्याला मारहाण केली. या घटनेचा संपूण थरार सीसीटीव्हीत कैद झालं आहे. (Viral Video)

नेमकं प्रकरण काय?

ग्रेटर नोएडामधील गौर सिटी २ अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. एका मुलाने महिलेला 'प्लीज, तुमच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका' अशी विनंती केली. मात्र महिलेने त्या मुलालाच बाहेर खेचून काढत त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होत आहे. तर काही संकेदाने दरवाजा पुन्हा उघडतो आणि मुलगा धावत लिफ्टमध्ये येऊन लिफ्टमध्ये रडताना दिसत आहे.

दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हायरल होत आहे. यावर हजारो रहिवासी रस्त्यावर उतरुन निषेध करु लागले. त्यांनी नोएडा पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच महिला श्वानांवरुन नेहमी इमारतीतील रहिवाशांसह भांडत असते असे रहिवाशांचं म्हणणं आहे. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. (Viral Video)

Comments
Add Comment