Saturday, November 1, 2025
Happy Diwali

Indore: घराच्या बाहेर रांगोळी काढत होत्या मुली, वेगवान कारने चिरडले

Indore: घराच्या बाहेर रांगोळी काढत होत्या मुली, वेगवान कारने चिरडले

मुंबई: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदोर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना कारने चिरडले. यात दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघांचीही स्थिती गंभीर आहे.

ही घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळेस मुली आपल्या घराबाहेर दिवाळीच्या सणासाठी रांगोळीची तयारी करत होत्या. त्याच वेळेस वेगवान कारने त्यांना चिरडले. स्थानिक लोकांनी कार तोडली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख केली. सोबतच पोलिसांनी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दुर्घटनेची सूचना मिळताच एरोड्रम पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले आणि जखमी मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सोबतच पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. दोन्ही मुलींची तब्येत गंभीर आहे. यातील एक मुलगी १९ वर्षांची आहे तर एक १३ वर्षांची मुलगी आहे.

Comments
Add Comment