Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सेबीकडून अनिल अंबानींच्या मुलाला एक कोटींचा दंड!

सेबीकडून अनिल अंबानींच्या मुलाला एक कोटींचा दंड!

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा मुलगा अनमोल (Anmol Ambani) याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेअर बाजार नियमनाशी संबंधित सेबीने ही कारवाई केली आहे. या सोबतच रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे मुख्य अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना देखील सेबीने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दोघांनाही ४५ दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (सेबी) सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, त्यांनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत चालू तपास पूर्ण केला आहे. त्या तपासात असं आढळून आलं आहे की, ज्या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी सेबीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कॉर्पोरेट कर्ज किंवा जीपीसीएल कर्ज मंजूर केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्टपणे निर्देश दिले होते की, अशा कर्जाची मंजुरी दिली जाणार नाही तरीही कर्ज देण्यात आलं आहे. २०१८-१९ मध्ये रिलायन्स होम फायनान्सच्या निधी वळवण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, सेबीने तपास केला आणि असे दिसून आले की अनिल अंबानी हे या फसवणूक योजनेचे मास्टरमाईंड होते, ज्यामुळे भागधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं.

अनमोल अंबानी यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी Acura प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं, तर संचालक मंडळाने ११ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला आणखी कर्ज न देण्याचे निर्देश दिले होते. आपल्या आदेशात, सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर २४ लोकांना सिक्युरिटीज मार्केटमधून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >