Monday, September 15, 2025

४०० दिवसांची SBIची जबरदस्त FD स्कीम, मिळेल तगडे व्याज

४०० दिवसांची SBIची जबरदस्त FD स्कीम, मिळेल तगडे व्याज

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही सेव्हिंग्स करतात तसेच हे सेव्हिंग्स कुठे ना कुठे गुंतवणूक करण्याचे प्लान करतात. यातून जोरदार रिटर्न मिळावेत तसेच पैसेही सुरक्षित राहावेत अशी आशा असते. खासकरून वरिष्ठ नागरिक हाच विचार करून गुंतवणूक करतात. यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने फिक्स डिपॉझिट म्हणजेच FDहा चांगला पर्याय आहे.

येथे महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ करता लोकांच्या खिशावर परिणाम केला होता. त्याचवेळस देशातील अनेक बँकांनी आपल्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करत ग्राहकांना दिलासा दिला होता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIने ४०० दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीम यासाठी खास लोकप्रिय आहे याचे नाव अमृत कलश स्कीम.

किती मिळत आहे व्याज?

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या अमृत कलश एफडी स्कीम ४०० दिवसांची स्पेशल एफडी स्कीम आहे. यात सामान्य ग्राहकांना ७.१० टक्के जोरदार व्याज दिले जात आहे. वरिष्ठ नागरिकांना तर यापेक्षा अधिक व्याजदर आहे. त्यांच्यासाठी हा व्याजदर ०.५० टक्के आहे.

४०० दिवसांच्या या एफडी स्कीमला इतकी पसंती मिळाली होती की याची डेडलाईन अनेकदा वाढवण्यात आली. पहिल्यांदा एसबीआयने १२ एप्रिल २०२३ही स्कीम सादर केली होती याची डेडलाईन २३ जून २०२३ ठेवण्यात आली होती. यानंतर ही वाढवू ३१ डिसेंबर २०२३ करण्यात आली होती. यानंतर ३१ मार्च २०२४ पर्यंत ही डेडलाईन वाढवण्यात आली. ही डेडलाईन संपण्याआधी एसबीआयने याची शेवटची तारीख वाढवून ३० सप्टेंबर २०२४ केली होती.

Comments
Add Comment