Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Swiggyच्या डिलीव्हरी बॉयने असे काही केले की तुम्हाला ऐकून बसेल धक्का...

Swiggyच्या डिलीव्हरी बॉयने असे काही केले की तुम्हाला ऐकून बसेल धक्का...

मुंबई: सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एका महिलेने दावा केला आहे की स्विगी जिनीच्या एका डिलीव्हरी पार्टनरने लॅपटॉप चोरला आहे. आणि तो परत देण्यासाठी तो १५ हजार रूपयांची मागणी करत आहे. ही घटना हैदराबादची आहे. पेशाने सिव्हिल इंजीनियर निशिथा गुडीपुरीने या घटनेबाबत लिंकडिनवर सांगितले.

गुडीपुरी यांनी सांगितले की त्यांच्या पतीने काही दिवसांपूर्वी स्विगी जिनीच्या माध्यमातून आपले बॅकपॅकला एका ऑफिसमधून दुसरे शहर माधापूर क्षेत्रात पाठवण्यासाठी बुक केले होते. डिलीव्हरी पार्टनरने बॅकपॅक घेतले. यात लॅपटॉपही होता. दरम्यान, यात्रेदरम्यान डिलीव्हरी पार्टनरने आपला फोन बंद केला.

गुडीपुरीने सांगितले की तिचा लॅपटॉप चोरला आहे आणि सुरूवातीला आम्हाला वाटले की आमच्याकडून चूक झाली. आम्ही जेनीचा वापर केला. मात्र त्यानंतर जी घटना घडली.

१५००० ची मागणी

गुडीपुरीच्या माहितीनुसार जेव्हा कपलने स्विगी एजंटशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क केला तेव्हा डिलीव्हरी एक्झिक्युटिव्हने सांगितले की त्याच्या मित्राने त्याच्या लॉग इनचा वापर केला. एजंटने सांगितले की याचा तपास केला जाईल. दरम्यान, कॉलच्या नंतर लगेचच त्या नंबरवरून १५ हजार रूपयांची मागणी करण्याचा मेसेज मिळाला.

शेअर केले फोटो

निशिथा गुडपुरीने लिंकेडिन पोस्टमध्ये आपले पती आणि पैशांची मागणी करणारी व्यक्ती व्हॉट्सअॅपवर झालेल्या चर्चेचा स्क्रीन शॉट शेअर केला. त्याने स्विगीसोबत रजिस्टर्ड व्यक्तीचा फोटोही शेअर केला.

Comments
Add Comment