Friday, September 19, 2025

Health: गोड खाण्याची योग्य वेळ काय असते? घ्या जाणून

Health: गोड खाण्याची योग्य वेळ काय असते? घ्या जाणून

मुंबई: बऱ्याच लोकांना गोड पदार्थ खायला फार आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ काय आहे? चुकीच्या वेळेस गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरास नुकसान होते. अनेक जण सकाळी उठताच गोड खातात तर काहीजण रात्री झोपण्याआधी गोड पदार्थ खातात. जाणून घेऊया गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळच्या वेळेस गोड खाल्ले पाहिजे का?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचे अन्न असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की सकाळच्या वेळेस गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. खरंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. यामुळे थकवा, चिडचिड तसेच पोटातील त्रास वाढतो. गोड खाल्ल्याने प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्ससारख्या पोषकतत्वांची कमतरता जाणवते.

गोड खाण्याची योग्य वेळ काय?

मिठाई खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणानंतर असते. कारण संपूर्ण दिवसात शरीराच्या कॅलरीज आरामात बर्न होतात. दुपारी जेवणानंतर तुम्ही गोड खाऊ शकता. मात्र सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस गोड खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Comments
Add Comment