Thursday, September 18, 2025

काव्यरंग : भेट तुझी माझी स्मरते

काव्यरंग : भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची । धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।। कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा । आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा । तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची ।। क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती । नावगाव टाकूनी आली अशी तुझी प्रीती । तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ।। केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली । ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली । श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची ।। सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास । स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास । सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ।।

नभं उतरू आलं

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।। अशा वलंस राती, गळा शपथा येती । साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।। वल्या पान्यात पारा, एक गगन धरा । तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।। नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू । गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।

Comments
Add Comment