Friday, September 19, 2025

Health: दररोज गुळाचे सेवन केल्याने मिळतात हे ५ फायदे

Health: दररोज गुळाचे सेवन केल्याने मिळतात हे ५ फायदे

मुंबई: भारतीय किचनमध्ये हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ(jaggery). गूळ हा साखरेच्या तुलनेत आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हल्ली समाजात आरोग्याबद्दल जागरूकता आल्याने साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन वाढले आहे.

गूळ(jaggery) हे चांगल्या स्वादासोबत आरोग्याचाही खजाना यावर असतो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात.

गुळाच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. गुळाच्या सेवनाने सदी-खोकल्यासारख्या समस्येपासून आराम मिळतो.

आले अथवा गूळ याच्या काढ्याच्या सेवनाने गळ्याचा खवखवपणा दूर होतो.

गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.

दररोज याच्या सेवनाने रक्ताची कमतरताही दूर होते.

सोबतच शरीरात विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास गुळाची मदत होते.

Comments
Add Comment