Monday, October 27, 2025
Happy Diwali

काव्यरंग

काव्यरंग

पोस्टमनदादा

पोस्टमनदादा पोस्टमनदादा रोज रोज वाटता पत्र खुशालीचा निरोप देत बनता सर्वांचे मित्र खाकीचा जाड पोशाख शोभून दिसतो अंगावर जाड पिशवी उघडून पत्र वाटता भराभर काळजीने बजावता तुम्ही आपले चोख काम ऊन असो, पाऊस असो मुळीच नसतो आराम सायकलची घंटा वाजवित येता तुम्ही दारी मनीऑर्डर दिली की आम्हा खुशी होते भारी पोस्टमनदादा पोस्टमनदादा सांग ना मला खरं तुम्हाला कसे हो माहीत प्रत्येकाची घरं? - रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ.

वरदान

काय गुन्हा माझा सांग ना रे देवा मन रोपटे प्रेमाचे हाच तुझा ठेवा ह्या आसमंती रे चंद्र तारके वसती फक्त या धरती बीज तुझे रुजती का ठेवतोस दुरावा ऊन पाऊस वारा लिवून सर्व सृष्टी शृंगाराचा पसारा देते सर्वस्व दान हरपून तिचे प्राण नव्याने जन्म घेते ठेव जरा जाण. नाही कुठेच रुजतं अंकुर हिरवळीचे अहोभाग्य समज वरदान धरतीचे. - सोनाली जगताप

आई

आई गं आई, बरं का गं बाई माझा तुझा वाढदिवस करशील की नाही? शोभा-शिला-शुभा, जोशांची विभा सर्वांच्या आधी येईल आई... लाल-लाल पाट, चांदीचं ताट, ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट... मुले-मुली येतील, गोल-गोल बसतील गोड-गोड लाडू मज्जेत खातील बुंदीचे लाडू जेवायला वाढू, वाढदिवसाला सेल्फी काढू... नाव : शौर्या सुमीत कासारे इयत्ता : पहिली शाळेचे नाव : सोशल सर्व्हिस लीग मराठी प्रायमरी स्कूल, मुंबई, परेल
Comments
Add Comment