Thursday, January 15, 2026

Amitabh Bachchan : बिग बींना रुग्णालयात केलं दाखल

Amitabh Bachchan : बिग बींना रुग्णालयात केलं दाखल

कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे बिग बी (Big B) म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

बिग बी यांना आज सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात (Kokilaben Ambani Hospital) दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची हृदयाच्या समस्येमुळे नाही तर पायात क्लॉट झाल्याने अँजिओप्लास्टी करण्यात आली.

बिग बींनी शेअर केलं ट्वीट

बिग बींनी नुकतंच एक ट्विट शेअर केले आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की,"मी तुमचा सदैव आभारी आहे." अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत, असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर लावला जात आहे.

Comments
Add Comment