Saturday, November 1, 2025
Happy Diwali

मुंबईत CNGच्या किंमतीत घसरण, प्रति किलो अडीच रूपयांनी कपात

मुंबईत CNGच्या किंमतीत घसरण, प्रति किलो अडीच रूपयांनी कपात
मुंबई: मुंबईमध्ये CNGच्या दरात कपात करण्यात आली आहे. प्रति किलो अडीच रूपयांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. आता मुंबईत एक किलो सीएनजीची किंमत ७३.५० रूपये असेल. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी मुंबई आणि महानगर क्षेत्रासाठी सीएनजीच्या दरात कपात केली. कंपनीने सीएनजीच्या किंमतीमध्ये प्रति किलो २.५ रूपयांच्या कपातीची घोषणा केली आहे.

आता ७३.४० रूपये प्रति किलो सीएनजीची किंमत

ही कपात ५च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. नव्या किंमतीच्या हिशोबाने आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रूपये द्यावे लागतील.

पेट्रोलच्या तुलनेत ५३ टक्के, डिझेलच्या तुलनेत २२ टक्के बचत

नव्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास यामुळे सामन्या लोकांची बचत होणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत ५३ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीवर २२ टक्के बचत होऊ शकते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >