Thursday, September 18, 2025

नाशिकमध्ये तब्बल दोन हजार रणरागिनींचे एकत्रीकरण..

नाशिकमध्ये तब्बल दोन हजार रणरागिनींचे एकत्रीकरण..

"मी येणार तुम्ही देखील या"- काजल हिंदूस्थानी

नाशिक : नाशिक जिल्हा ढोल ताशा पथक आयोजित कोजागिरी पौर्णिमा निमित्त “महिलांवर अधर्मियांकडून होत असलेल्या अत्याचाराला प्रतिबंध” या माहितीपूर्ण व प्रेरणादायी परिसंवादाचे आयोजन शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गोदा श्रद्धा लॉन्स रामवाडी रोड नाशिक येथे संपन्न होणार आहे. परिसंवादात अहमदाबाद गुजरात येथील सुप्रसिद्ध महिला सुरक्षा व हिंदुत्व या विषयात माहिर असलेली वक्ता काजल हिंदुस्थानी उर्फ काजल दीदी येणार आहे.

नाशिक सह राज्यभरात महिलांवर विधर्मी लोकांकडून अत्याचार होताना दिसतात आहे म्हणजे लव जिहाद खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवले जाते आहे तसेच त्यात नाशिक शहरात महिला मुली यांचे मिसिंगचे प्रमाण वाढले आहे आणि ह्या अत्याचारांच्या संख्येत मोठी वाढ देखील झाली आहे. त्यामुळे महिलांनी अशी घटना घडू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तसेच जर एखादी घटना घडलीच तर मदतीचा हात मिळविण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत? कुठलीही घटना सांगून येत नाही, संकट आल्यानंतर सक्षमपणे संकटाला सामोरे जाऊन प्रतिकार केला पाहिजे. या सविस्तर गोष्टींचां प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी महिलांसाठी जागरण रागिनींचा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्यामध्ये मुख्य वक्ता म्हणून काजल दीदी नाशिक येथे येणार आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं ते सदर कार्यक्रमात देणार आहेत त्यामुळे नाशिक जिल्हा ढोल ताशा समितीकडून मोठ्या संख्येने महिलांनी यावे असे आवाहन सकल हिंदू समाजाला, महिला मुली यांना करण्यात आहे आहे.

Comments
Add Comment