 
                            तैपेई: तैवानची राजधानी तैपेईमध्ये मंगळवारी सकाळी ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. वृ्त्त एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार या भूकंपादरम्यान तायपेमध्ये इमारती हलू लागल्या.
दरम्यान, या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तैवानमध्ये केंद्रीय हवामान ब्युरोने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व किनाऱ्याजवळी समुद्रात होता.
नेपाळमध्येही आला भूकंप
मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार राजधानी काठमांडूमध्ये आज सकाळी ४.१७ मिनिटांनी ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.

 
     
    




