Sunday, September 14, 2025

२० दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवल, सून-मामीने रचला होता कट

२० दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवल, सून-मामीने रचला होता कट

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात २० दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. २० दिवसांच्या आता एकामागोमाग एक असे पाच जण दगावले. दरम्यान, तीन जण रुग्णालयात दाखल आहेत. सर्वांना एकाच प्रकारची लक्षणे दिसत होती. त्यांचे शरीर दुखत होते. बोलताना त्रास होत होता तसेच ओठ काळे पडत होते. जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा पोलीसही चक्क हैराण झाले.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तहसीलच्या महागावात शंकर पीरू कुंभारे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. अचानक शंकर आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांची तब्येत बिघडली. २० सप्टेंबरला शंकर आणि पत्नी विजया यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत अधिकच बिघडल्याने दोघांना नागपूरच्या प्रसिद्ध रुग्णालयात दाखल कऱण्यात आले मात्र उपचारादरम्यान २६ सप्टेंबरला शंकर यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २७ सप्टेंबरला विजया यांचा मृ्त्यू झाला.

आई-वडिलांच्या मृत्यूने विवाहित मुलगी दुखात होती. ती या दुखातून सावरत नाही तोवर गडअहेरीमध्ये राहणारी मुलगी कोमल दहागांवकर आणि मुलगा रोशन कुंभारे यांची तब्येत बिघडली. यासोबत शंकर कुंभारे यांची मेव्हणी आनंदा उर्फ वर्षा उराडे हिचीही तब्येत बिघडली. तिघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ ऑक्टोबरला कोमलने उपचारादरम्यान प्राण सोडले. त्यानंतर १४ ऑक्टोबरला शंकर कुंभारेची मेव्हणी वर्षा उराडे हिचा मृत्यू झाला. तर पुढच्याच दिवशी शंकरचा मुलगा रोशन कुंभारेचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी सांगितले, सगळ्यांना दिले होते विष

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू आणि तीन लोकांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांना आढळले की सर्वांना एकाच प्रकारची लक्षणे होते. जसे अंगदुखी, पाठीच्या खालच्या भागात तसेच डोके प्रचंड दुखणे, ओठ काळे पडणे, तसेच बोलताना त्रास होणे. या लक्षणांच्या आधारे डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितले की यांना विष देण्यात आले होते. त्यानंतर अधिक तपास केला असता या सर्वांना आर्सेनिक विष देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले हे विष रंगहीन तसेच गंधहीन असते.

शंकरची सून आणि मेव्हणाच्या पत्नीकडून गुन्हा केला कबूल

या दरम्यान पोलिसांना आपल्या गुप्तचर विभागाकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार शंकर कुंभारे याची सून संघमित्रा आणि मेव्हण्याची पत्नी रोजा रामटेके यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान या ५ जणांच्या मृत्यूमागे या दोघांचा हात असल्याचे समजले.

अधिक चौकशी केली असता संघमित्राने सांगितले की आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध जात तिने शंकरचा छोटा मुलगा रोशनशी लग्न केले होते. यामुळे संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. यामुळे पती शंकर आणि तिच्या सासरचे तिला नेहमी टोमणे मारत. याच कारणामुळे तिने बदला घेण्याचा विचार केला. तर रोजाने पोलिसांना सांगितले की तिच्या पतीची बहीण विजया आपल्या बहिणींसह मिळून तिच्या सासऱ्याच्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. यावरून रोजा आणि विजयाचा वाद होत असे. यामुळेच तिच्या हत्येचा कट रचला.

खाण्यापिण्यातून दिले जात होते विष

पोलिसांच्या माहितीनुसार प्लाननुसार रोजा रामटेकेने तेलंगणामध्ये जाऊन विष आणले होते. जेव्हा संधी मिळत असे तेव्हा ती शंकरच्या कुटुंबियांच्या खाण्यात विष टाकत असे. जेवणासोबतच पिण्याच्या पाण्यातही विष मिसळत असे. हे विष हळूहळू शंकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या शरीरात पसरत गेले आणि ते आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेचा खुलासा झाल्यानंतर शंकरची सून आणि मेव्हण्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment