 
                            मुल्तान : आशिया कप २०२३ची (asia cup 2023) सुरूवात रेकॉर्डब्रेक विजयासह झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ (nepal) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात मुल्तानमध्ये रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी शतके ठोकली. याच्या जोरावर पाकिस्तान संघाने २३८ धावांच्या अंतराने रेकॉर्ड विजय मिळवला.
सामन्यात नेपाळच्या संघाला ३४३ धावांचे आव्हान मिळाले होते. याला प्रत्युत्तर देताना नेपाळचा संपूर्ण संघ २३.४ ओव्हरमध्ये १०४ धावांवर कोसळला. सोमपाल कामीने २८, आरिफ शेखने २६ आणि गुलशन झाने १३ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दहाचा आकडा पार करता आला नाही.
शादाबने घेतल्या ४ विकेट
पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खानने २७ धावा देत ४ विकेट मिळवल्या. तर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफने २-२ विकेट घेतल्या. या रितीने पाकिस्तानने आशिया कपमध्ये धमाकेदार विजयासह विजयी सुरूवात केली आहे. नेपाळ पहिल्यांदा आशिया कप खेळत आहे. तर पाकिस्तान आयसीसी वनडे रँकिंगची नंबर १ टीम आहे.

 
     
    




