Sunday, September 14, 2025

Chandraayaan 3 : 'चांद्रयान ३'च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांनी घेतले देवाचे दर्शन

Chandraayaan 3 : 'चांद्रयान ३'च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांनी घेतले देवाचे दर्शन

नवी दिल्ली : चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) यशाचे सेलिब्रेशन संपूर्ण देश साजरा करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३च्या ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंगच्या चार दिवसांनी रविवारी इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ (isro chief s somnath) केरळच्या तिरूअनंतपुरममधील पूर्णमेकवू -भद्रकाली मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. चांद्रयान ३च्या यशानंतर ते देवाच्या दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मी येथेही काहीतरी शोधत असतो असे सांगितले. तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील ताळमेळीबाबत आपला गृष्टिकोनही व्यक्त केला.

मनाच्या शांततेसाठी मंदिरात जातो

इस्त्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले, मी एक शोधकर्ता आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोघांचा शोध घेणे हा माझ्या जीवनाचा भाग आहे. मी अनेक मंदिरात जातो तसेच मी अनेक धर्मग्रंथ वाचले आहेत यासाठी या ब्रम्हांडामध्ये आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक प्रवास आहे. आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. मी विज्ञानावरही काम करतो. सोबतच मनाच्या शांततेसाठी मंदिरातही जातो.

 

लँडर आणि रोव्हर व्यवस्थित काम करत आहेत

इस्त्रो प्रमुख म्हणाले, चांद्रयान ३चे लँडर आणि रोव्हर दोन्ही व्यवस्थित आहेत आणि नीट काम करत आहेत. यात लावलेली सर्व पाच उपकरणे सुरू आहेत. याद्वारे आम्हाला चांगला डेटा मिळत आहे. या दरम्यान एस सोमनाथ म्हणाले, येणाऱ्या काही दिवसांत ३ सप्टेंबरपर्यंत आम्ही अनेक प्रयोगांना पूर्णत्व देऊ.

शिवशक्ती नाव ठेवण्याबाबत काय म्हणाले? इस्त्रो प्रमुख

चांद्रयान ३ने ज्या ठिकाणी स्पर्श केला त्याला शिवशक्ती हे नाव देण्यात आले. याबद्दल बोलताना ते म्हणाले, हे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. आमच्यासाठी हे उपयुक्त आहे. यात काहीही चुकीचे नाही.

Comments
Add Comment