Monday, September 15, 2025

Wardha News: आरएसएस पदाधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी हिंगणघाटमध्ये तणाव

Wardha News: आरएसएस पदाधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी हिंगणघाटमध्ये तणाव

वर्धा : वर्ध्याच्या (Wardha News) हिंगणघाटमध्ये तरुणांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वर्धा जिल्हा संघचालक यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinghanghat Police Station)  एकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीवर कारवाईची मागणी केली. सध्या परिस्थीती नियंत्रणात आहे आणि या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरु आहे.

जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. जेठानंद राजपूत हे आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक होते. बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत यांनी मध्यस्ती केली असता वादातील संबंधित युवकांने वाद घातला. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर बोलावत नांदगाव येथे बस थांबवून मारहाण केली, घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.

रात्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण

घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले. याबाबत सुद्धा पोलिसांकडून (Police) माहिती घेतली जातं आहे. सायबर टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर भडकवणारे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर  हिंगणघाटेमध्ये तणावाचे वातावण निर्माण झाले होते. परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment