Thursday, September 18, 2025

भाजप म्हणते माघार...साक्षी म्हणते नाही!

भाजप म्हणते माघार...साक्षी म्हणते नाही!

वैशाली पोतदार यांच्या ट्वीटवर साक्षीचा खुलासा

नवी दिल्ली: कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट आंदोलन करत होते. यानंतर साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी ट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकने माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे.

त्यावर आता साक्षीने ट्वीट करत खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणी मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नका.

आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांना ( ब्रिजभूषण सिंग ) अटक करण्याची मागणी केली आहे. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे, असं साक्षी मलिकने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Comments
Add Comment