Saturday, October 18, 2025
Happy Diwali

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्‍स्‍प्रेसचा मुहूर्त ठरला!

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्‍स्‍प्रेसचा मुहूर्त ठरला!
  • ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

  • राणेंच्या पाठपुराव्याला यश! वंदे भारत कणकवलीतही थांबणार

पणजी : मडगाव–मुंबई सीएसएमटी वंदे भारतला ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ५ जूनपासून ही सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.

वंदे भारत हायस्‍पीड ट्रेनच्या उद्घाटनासाठी मडगाव रेल्वे स्थानक सज्ज झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

असे आहे वेळापत्रक!

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावच्या प्रवासात ही गाडी सीएसएमटी येथून सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी निघणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर ६ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल. पनवेल रेल्वे स्थानकावर ६ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. खेड रेल्वे स्थानकावर ८ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दहा वाजता पोहोचेल. सिंधुदुर्ग मधील कणकवली रेल्वेस्थानकावर ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी पोहचेल आणि शेवटच्या स्थानकावर अर्थातच मडगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रवासात ही गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. कणकवली रेल्वे स्थानकावर ही गाडी ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रत्नागिरी स्थानकावर ५ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. रोहा येथे ८ वाजून ५ मिनिटांनी आणि पनवेल येथे ९ वाजून १८ मिनिटांनी ही ट्रेन पोहोचणार आहे. तर रात्री साडेदहा वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा