पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश
May 15, 2023 01:39 PM
पुरंदर : पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे १६ मे ला भाजपात प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली. देवेंद्रजींसोबत मी अधिक चांगलं काम करु शकेन असं मला वाटतं म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे", असं अशोक टेकवडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांचा हा प्रवेश राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का आहे.