Sunday, December 7, 2025

अकोल्यात वादग्रस्त पोस्टमुळे दंगल, १४४ कलम लागू

अकोल्यात वादग्रस्त पोस्टमुळे दंगल, १४४ कलम लागू

अकोला: शहरातील जूने शहर पोलीस स्टेशन हद्दीत वादग्रस्त सोशल मिडिया पोस्टमुळे काल रात्री दंगल झाली. यावेळी दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीमुळे एकाचा मृत्यू तर १० जण जखमी झाले आहेत. तसेच यामध्ये अग्नीशमन वाहनांसह अनेक वाहनांची जाळपोळ व तोडफोड झाली झाली आहे. सध्या येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत २६ लोकांना अटक करण्यात आली असून समाजाविरोधात पोस्ट करणारा आरोपी देखील अटकेत आहे, अशी महिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल तसेच जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

परिस्थितीवर तात्काळ नियंत्रित मिळण्यात यश यावं, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिल्या. काल अमरावतीहून पोलीस दलाच्या तुकड्या हजर झाल्यानंतर रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

सध्या अकोला पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, असं आवाहन भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केलं आहे.

Comments
Add Comment