Saturday, December 27, 2025

‘आई कुठे काय करते’ मालिकेत ट्विस्ट

‘आई कुठे काय करते’ मालिकेत ट्विस्ट

'आई कुठे काय करते’, ही मालिका सध्या इशाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. दरम्यान, मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार असून आगामी भागात अभिषेकचा मोठा अपघात झालेला दिसून येईल. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागात अभिषेक एका वयोवृद्ध व्यक्तीला वाचवायला जाणार आहे. त्या व्यक्तीला वाचवताना त्याची गाडी स्लिप होते आणि त्याला चांगलाच मार बसतो. त्याच्या एका हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे एक तिसरी व्यक्ती त्याला आधार देत त्याच्या घरी घेऊन येते. अभिषेकला जखमी अवस्थेत पाहून त्याच्या कुटुंबीयांची मात्र पायाखालची जमीन सरकणार आहे.

Comments
Add Comment