Sunday, March 15, 2026

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई

नवा दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभेच्या मुख्य सचिवांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी राहुल गाधी यांच्यासह राष्ट्रपती, पंतप्रधान, निवडणूक आयोग आणि सर्व संबंधितांना पाठवले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने दोन वर्षाची शिक्षा झालेल्या लोकसभा सदस्याची खासदारकी रद्द होते या नियमाखाली राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केली होती. कर्नाटक रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की- सर्व चोरांचे आडनाव मोदी का? या विधानावरून त्यांच्याविरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला सुरू होता. यासंदर्भात सुरतच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Comments
Add Comment