Thursday, September 18, 2025

‘वुमन्स प्रीमियर लीग’करिता महिलांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश

‘वुमन्स प्रीमियर लीग’करिता महिलांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : महिला प्रीमियर लीगचा थरार चार मार्चपासून रंगणार असून ही स्पर्धा महिला आणि मुली स्टेडियममध्ये मोफत पाहू शकणार आहेत. स्पर्धेच्या सर्व २२ सामन्यांसाठी महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

यंदा प्रथमच महिला आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंटस यांच्यामध्ये नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअमवर महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना रंगणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानात रंगणार आहेत. त्यासाठी तिकिटविक्रीला सुरुवात झाली आहे. वुमन्स प्रीमियर लीग पाहण्यासाठी महिलांना आणि मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेच्या सर्व २२ सामन्यांसाठी महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पुरुषांना मात्र तिकिट आकारले जाणार आहे.

Comments
Add Comment