 
                            मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात एकच नाव अजरामर राहिलं ते म्हणजे नरेंद्र मोदी अशा शब्दांत मोदींवर कौतूकसुमने उधळत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी भारतीय रेल्वेचे आद्यजनक नाना शंकरशेठ यांचेही स्मरण फडणवीस यांनी केले. तर मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त महामार्गांचे काम झाले असे सांगितले. यावेळी बाळासाहेब ठाकरे महामार्ग तसेच मुंबई मेट्रोचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले यामुळे जनतेला भरपूर फायदा होत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच देशाने जे ५ ट्रिलियनची इकोनॉमीचे ध्येय निश्चित केले आहे त्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियनचा वाटा असेल असा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केला.

 
     
    




