Friday, October 31, 2025
Happy Diwali

'पठाण'चे प्रेक्षकांकडून ढोल ताश्यांनी स्वागत

'पठाण'चे प्रेक्षकांकडून ढोल ताश्यांनी स्वागत

बहुचर्चित आणि वादग्रस्त पठाण चित्रपटासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तोबा गर्दी केली आहे. आज प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं अ‍ॅडव्हान्स बुक करण्यात आली होती.

बॉलीवुडच्या किंग खानला बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोचं प्रेक्षकांनी बुकींग केलं होतं. काही ठिकाणी सकाळीच चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडण्यात आले. तर काही ठिकाणी ढोल-ताशावर चाहत्यांनी ठेका धरला. दरम्यान सोशल मिडियावर चित्रपटगृहाबाहेरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात प्रेक्षक जल्लोष करताना दिसत आहेत. या चित्रपटातील दिपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम याच्याही भूमिकेची चर्चा आहे.

‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार का? असं प्रश्नचिन्ह असताना त्याच्या प्रदर्शनावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे.

https://twitter.com/Harmindarboxoff/status/1617903481037422592?cxt=HHwWgIDUwZup-fMsAAAA

‘पठाण’ चित्रपट ऑनलाईन लीक?

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. ‘पठाण’ ऑनलाईन लीक होईल अशी चित्रपटाच्या निर्मिती कंपनीला शंका होती. त्यामुळे त्यासंदर्भात सगळी काळजी घेण्यात येऊनही ‘पठाण’ चित्रपट लीक करण्यात झाल्याचे समजते.

https://twitter.com/Harmindarboxoff/status/1618093526675509248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1618093526675509248%7Ctwgr%5E8034c4c646db17ae63512171644de53adf41e425%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbollywood%2Fshahrukh-khan-deepika-padukone-pathaan-movie-audience-line-up-outside-theaters-to-watch-film-see-details-kmd-95-3421797%2F
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा