Thursday, September 18, 2025

गुजरात निवडणुकीत मोदींनी कोविडचे नियम पाळले होते का?

गुजरात निवडणुकीत मोदींनी कोविडचे नियम पाळले होते का?

आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 'कोविड प्रोटोकॉल'बाबत लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसने जोरदार प्रहार केला आहे.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचे लक्ष वळवण्यासाठी ते विविध समस्या निर्माण करत आहेत. भाजपला विचारायचे आहे की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळलेत का? पंतप्रधान मोदींनी मास्क घालून घरोघरी प्रचार केला होता का? मला वाटतं, मनसुख मांडविया यांना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आवडत नाही, पण लोकांना ती आवडली आहे. लोक यात सक्रीय सहभाग घेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारला कोविड धोक्यासाठी संसदेचे अधिवेशन थांबवणार का? असा सवाल केला आहे.

Comments
Add Comment