Friday, September 19, 2025

इच्छापूर्तीचा आनंद मिळाला

इच्छापूर्तीचा आनंद मिळाला

सन १९६५ सालापासून माझे वडील शिवराम आत्माराम भाटकर व माझी आई वालावल गावी आल्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराजवळील तळ्यात आंघोळ केल्यानंतर देवदर्शनाला जात. एकदा आंघोळ करून देवदर्शनाला जाताना प.पू. राऊळ महाराज त्यांच्यासमोर दत्त म्हणून हजर झाले. तेव्हा दोघांनीही महाराजांना नमस्कार केला. त्यांना आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी महाराजांना सांगितले की, त्यांना वालावल गावातच घर असलेली जागा घ्यायची आहे. महाराजांनी आशीर्वाद देऊन त्यांना सांगितले, तुमच्या मनासारखे होईल.

थोड्याच दिवसात तेथे त्या गावातील घर असलेली जमीन विकण्यासाठी तेथील एक ब्राह्मण माधव सदाशिव जड्ये आले. ती जमीन महाराजांनी शिवराम भास्कर या दांपत्याला मिळवून दिली. त्याचप्रमापणे माझे भाऊ श्रीपाद शिवराम भास्कर यांचे लग्नाचे कुठेच जमत नव्हते. खूप मुली पाहिल्या. पण एकही ठिकाणी लग्नाचे जुळेना. म्हणून माझे वडील माझ्या भावाला घेऊन प.पू.राऊळ महाराजांकडे गेले. आपली अडचण सांगितली तेव्हा महाराजांनी सांगितले, तुम्ही घाबरू नका लवकरच लगीन जमून जाईल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच गावच्या एका सुशिक्षित मुलीशी माझ्या भावाचे लग्न लागले. आता आमचे सर्व कुटुंब राऊळ महाराजांच्या आशीर्वादाने व कृपाप्रसादाने सर्व सुख-संपन्न आहे.

- समर्थ राऊळ महाराज
Comments
Add Comment