Wednesday, September 17, 2025

भांडुपमध्ये चायनीज हॉटेलला भीषण आग

भांडुपमध्ये चायनीज हॉटेलला भीषण आग

किशोर गावडे

मुंबई : भांडुप पश्चिमेच्या शिवाजी तलावा जवळील दुर्गा चायनीज या हॉटेलला आज मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

दुर्गा चायनीज हॉटेल हे मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी आहे. आग पसरण्यापूर्वीच आटोक्यात आल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

Comments
Add Comment