Thursday, September 18, 2025

प्रसिद्ध अभिनेत्री दीपाचा संशयास्पद मृत्यू?

प्रसिद्ध अभिनेत्री दीपाचा संशयास्पद मृत्यू?

चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील पॉलिन जेसिका उर्फ दीपा या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या चेन्नईमधील अपार्टमेंटमध्ये १८ सप्टेंबर रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. दीपाचे वय केवळ २९ वर्षे आहे. पोलिसांना तिच्या खोलीतून एक संशयास्पद सुसाईड नोटही मिळाली आहे. त्यामुळे दीपाने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाचा सगळ्यात जवळचा मित्र प्रभाकरण हा सगळ्यात आधी घटनास्थळी पोहोचला. मृतदेह बघताच आंध्र प्रदेशमध्ये रहाणाऱ्या तिच्या भावाला घटनेची कल्पना देण्यात आली. कोयंबडू येथील पोलिसांना त्याने सदर घटनेची माहिती देताच पोलीस दीपाच्या राहत्या घरी पोहोचले. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दीपाच्या खोलीतून एक डायरीही जप्त केली आहे. अभिनेत्रीला तिचे आयुष्य नकोसे होते, कारण तिला तिच्या आयुष्यात पाठिंबा देणारे कोणी नव्हते, असे तिने लिहीले असल्याचीही माहिती पुढे येत आहे. तिचे कोणावर तरी प्रेम होते पण त्याने तिचा स्वीकार केला नव्हता. डायरीमधील हा मजकुर वाचल्यानंतर पोलीस आता या मुलाचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment