Sunday, December 28, 2025

बँकॉक येथे नाईट क्लबमध्ये अग्नीतांडव; १३ जणांचा मृत्यू

बँकॉक येथे नाईट क्लबमध्ये अग्नीतांडव; १३ जणांचा मृत्यू

बँकॉक : राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाले आहेत, शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

बँकॉक येथील सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये शुक्रवारी सकाळी १ वाजण्याच्या सुमारास लागल्याचे पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिली आहे. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा