Sunday, October 26, 2025
Happy Diwali

आज जाहीर होणार आयसीएसई बोर्डाचा निकाल

मुंबई : आयसीएसई बोर्ड परीक्षेचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.

कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे २०२२ मध्ये झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन सीआयएससीई आज आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोन मधील एकही परीक्षा दिली नसेल तर अनुपस्थित म्हणून निकाल येईल. शाळा सुद्धा प्रिन्सिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून निकाल पाहू शकतील.

Comments
Add Comment