Tuesday, September 16, 2025

जखमी नदालची विम्बल्डनमधून माघार

जखमी नदालची विम्बल्डनमधून माघार

लंडन (वृत्तसंस्था) : स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. पोटाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याचे त्याने म्हटले आहे. राफेलच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्मसन्मानासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे राफेल नदालने म्हटले आहे. नदालला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पोटातील स्त्नायूंमध्ये दुखापत होती. मात्र, बुधवारी झालेल्या टेलर फ्रिट्झविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत ही दुखापत वाढली.

असह्य वेदना होत असतानाही नदालने लढा देत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता ही दुखापत वाढल्याने नदालने उपांत्य फेरीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ”दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. ही दुखापत दीर्घकाळ राहू नये, त्यामुळे मी हा निर्णय घेतला” असल्याचे नदालने म्हटले आहे.

Comments
Add Comment