Tuesday, September 16, 2025

हॉटेलच्या बिलातील सर्व्हिस चार्जची सक्ती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश प्राधिकरणाने जारी केला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकारत होते, त्यावर आता प्राधिकरणाने बंदी घातली आहे.

सीसीपीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आक्षेप असल्यास, ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवाशुल्क वसूल करण्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ वर तक्रार करू शकतात. तसेच कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवा शुल्क आकारण्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा